राहुल कोळसे:गुहा:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान राहुरी फॅक्टरी आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट गुहा तसेच सकल हिंदू समाज राहुरी तालुका यांच्या वतीने गुरुवारी सकाळी आठ वाजता अतिशय उत्साहाने व शांतेत दुर्गा माता दौड संपन्न झाली.
दुर्गा माता दौड मध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान राहुरी फॅक्टरी येथील युवक त्याचबरोबर गुहा गावातील तरूण, महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते .पांढरा पोशाख डोक्यावर पांढरी टोपी परिधान करून, हातात भगवा ध्वज मुख्य आकर्षण होते. गावातील मुख्य रस्त्यावरून जात असताना सडा, रांगोळी काढून फुलांची सजावट केली होती.ठिकठिकाणी ध्वजाची पूजा करून दौडचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले.यात्रा कानिफनाथ देवस्थान कमान,जय मातादी चौक,मांजरे वस्ती,राऊत वस्ती,बडोदा बँक,हनुमान मंदिर मार्गाने कानिफनाथ महाराज मंदिर येथे सांगता झाल्यानंतर महाआरती होऊन त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.




