Sunday, October 26, 2025

भेंडा येथील पहील्या सौरउर्जा प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील राज्यातील पहील्या २० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नुकतेच ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार,कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे,उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात भेंडा येथील २० मेगावॅट सौरउर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले हा राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या नेवासा येथून सुरु करण्यात आलेला असून शेतीसह घरगुती आणि व्यावसायिकांना मिळणार २४ तास विज पुरवठा होणार असून या प्रकल्पातून तालुक्यातील १२ गावांना नवी झळाळी मिळणार असल्याची माहीती यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.

या विज प्रकल्पातून नेवासा तालुक्यातील म्हसले येथे १० मेगावॅट तर रांजणगाव व नजिकचिंचोली येथे प्रत्येकी ५ मेगावॅट असे तीन स्वतंत्र सोलर वीज निर्मिती संच बसविण्यात आलेले असून त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा उपयोग दिवसा शेतीसाठी कृषी पंपांना वीज पुरवठा केला जाणार आहे विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसभर निर्माण होणारी स्वस्त विज १२.५ मेगावॅट क्षमतेच्या बॅटऱ्यांमध्ये साठवली जाणार असून रात्रीच्या वेळी हीच स्वस्त विज वापरून तालुक्यातील भेंडा, सौंदाळा, म्हसले,नजिक चिंचोली, रांजणगाव, तरवडी, भानसहिवरा, कारेगाव, खुणेगाव,गेवराई, गोंडेगाव,पिचडगाव आदी १२ गावांना अखंडीत वीज पुरवठा सुरु राहणार आहे.
  नेवासा तालुक्यातील सुमारे ७०३० शेती कृषी वीज पंपाना दिवसा विज पुरवठा सुरु करण्यात येणार असून ४६०० घरगुती आणि वाणिज्य तसेच औद्योगिक ग्राहकांना बॅटरीमध्ये साठवलेली हीच वीज या सौरउर्जा प्रकल्पातून वितरीत केली जाणार असल्याची माहीती यावेळी आमदार लंघे – पाटील यांनी दिली तसेच या बॅटरी बॅकअपसह आधुनिक सौरऊर्जा प्रणाली प्रकल्पामध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरून २० मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनेल या प्रल्कपामध्ये बसविलेले असून या राज्यातील पहीला यशस्वी सौरउर्जा प्रकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करुन लवकरच सुरु केला जाणार असल्याची माहीतीही यावेळी त्यांनी दिली.

*सार्थअभिमान…

सौंदाळा (ता.नेवासा) येथील राज्यातील पहील्या सौर – उर्जा प्रकल्पाचे नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करुन हा प्रकल्प नेवाशातून सुुरु झाल्यामुळे नेवासा तालुक्याच्या शिरपेचात देशात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचा सार्थअभिमान आहे

आमदार विठ्ठलराव लंघे
नेवासा विधानसभा मतदार संघ

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!