गुहा: राहुल कोळसे:पैशाचा व आपल्याकडे असलेला पदाचा अहंकार असेल तर मनुष्याचा विनाश ठरलेला असतो आपल्याला पाहिल्यामुळे समोरच्याला दुःख होत किंवा तो आपला तिरस्कार करत असेल तर असेल तर तिथे सोन्याचा पाऊस पडत असेल तर माणसाने त्या ठिकाणी जाऊ नये. दक्ष प्रजापती व लंकाधिश यांचे दाखले देऊन उदाहरणासहित पटवून दिले . शब्द हे शस्त्र आहे या शब्दांमुळेच महाभारत घडले पैसा हे जीवनात सर्वस्व नाही असे मौलिक विचार देवगड देवस्थानाचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
कोल्हार भगवतीपुर येथील भगवती मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी पाचव्या माळीनिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज पुढे बोलताना म्हणाले की कोल्हार पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे भाग्य आहे साडेतीन शक्तिपीठे या एकच ठिकाणी आहे.कोणाचा अपमान करण्यासाठी धार्मिक केले जात असेल तर ते कार्य फळ देत नाही.भक्तांची भक्ती ही निःस्वार्थी असले पाहिजे. अशी भक्ती देवाला प्रिय असते .जीवनात नम्रपणे वागून चांगले बोलून माणसं जोडावीत असे महाराजांनी सांगितले.
यावेळी कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब उर्फ सयाजी रघुनाथ खर्डे उपाध्यक्ष साहेबराव दळे,मधुकर खर्डे ,तात्या महाराज शिंदे, शुभम बनकर ,कैलास गुरसळ ,महेश थोरात ,पत्रकार प्रमोद कुंभकर्ण, पत्रकार राहुल कोळसे , प्रवीण बेंद्रे ,विजय डेंगळे नारायण मोरे आदीसह मान्यवर व कोल्हार भगवतीपुर चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी देवालय ट्रस्टच्या वतीने उपाध्यक्ष साहेबराव दळे यांनी महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांचा सत्कार केला तर आभार विजय डेंगळे यांनी मांडले .




