नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेने नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजने अंतर्गत सभासद-खातेदारांसाठी घेतलेल्या विमा पॉलिसी मधून संस्थेचे खातेदार खातेदार विशाल राजू साळुंके यांना दवाखाना उपचार खर्चाची मदत म्हणून ८० हजार ४८९ रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
संत नागेबाबा मल्टीस्टेट भेंडा शाखेतील खातेदार विशाल राजू साळुंके यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून चालू केलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजने नाव नोंदणी केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा रस्ता अपघात झाला. त्यासाठी त्यांचा दवाखाना उपचारासाठी ८०,४८९ रुपये खर्च झाला.या दवाखाना उपचार खर्चाच्या रकमेचा धनादेश नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती काशिनाथ नवले पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संचालक गणपतराव गव्हाणे,अजित रसाळ, आबासाहेब काळे,रामकृष्ण नवले, डॉ.रजनीकांत पुंड, बाबासाहेब गायकवाड,संजय नवले,अवधूत लोहकरे,किशोर नवले, सुभाष चौधरी, बाळकृष्ण पुरोहित, कारभारी गरड,सुनील गव्हाणे,राजेंद्र चिंधे,अफजल पटेल,रामदास आढगळे, प्रा.सविता नवले,जालिंदर देशमुख, नागेबाबा मल्टीस्टेटचे रिजनल ऑफिसर मिसाळ, श्री.जमधडे, नागेबाबा पतसंस्थेचे अधिकारी दिलदार शेख, भेंडा शाखेचे शाखाधिकारी संतोष साप्ते, लक्ष्मण थोरात आदी यावेळी उपस्थित होते.




