नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यास या वर्षिच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला ३ हजार रुपये प्रति टन पहिली उचल देणार असून अंतिम ऊस दर हा अंतिम साखर उताऱ्या नुसार देण्यात येईल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ५२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी श्री.घुले बोलत होते.
कारखान्याचे जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे,काशिनाथ नवले,साखर कामगार संघटनेचे सरचिटणीस नितिन पवार,संचालक काकासाहेब शिंदे , पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, भाऊसाहेब कांगुणे, दादासाहेब गंडाळ, विष्णुपंत जगदाळे, सखाराम लव्हाळे, प्रा.नारायण म्हस्के, मछिंद्र म्हस्के, जनार्धन कदम, विकास नन्नवरे, संतोष पावसे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी संचालक श्री.बबनराव भुसारी व सौ.छाया भुसारी, कारखाना सभासद श्री.पांडुरंग जमधडे व सौ.नंदा जमधडे, श्री.महेश ढोकणे व सौ.शीतल ढोकणे, श्री.राहुल बेडके व सौ.सुषमा बेडके व बॉयलर अटेंडन्ट राजेंद्र मुंगसे व सौ.चंद्रकला मुंगसे यांचे हस्ते सपत्नीक बॉयलरची विधीवत पुजा करण्यात आली.
यावेळी बोलतांना *उपाध्यक्ष पांडुरंग अभंग* म्हणाले की, १ नोव्हेबर पासून गळीत हंगाम सूरु होत आहे.पहिल्या दिवसापासून प्रति दिन ९५०० मेट्रिक टनाहून अधिक ऊसाचे गाळप केले जाणार आहे. त्या दृष्टीने तोडणीची व्यवस्था केल्याने सर्वांचे ऊस
क्रमवारी नुसार वेळेतच तुटतील.
आपल्या कारखान्याचा ऊस वजन काटा ऑनलाइन आणि अचूक आहे.
१२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट असून हंगाम यशस्वी करण्यासाठी उस उत्पादक शेतकरी व कामगारांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
*कामगार नेते नितिन पवार* म्हणाले की, शेतकरी व कामगारांचे हित जोपण्यासाठी लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी उभी केलेली ही कामधेनु आहे. नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील हे नेहमीच संस्था, शेतकरी व कामगारांचे हित जोपासत आहेत.या कामधेनुला जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याने ऊस उत्पादक शेतकरी-कामगार व त्यांचे कुटुंबिय,नातेवाईक यांनी ज्ञानेश्वरलाच ऊस द्यावा असे आवाहन श्री.पवार यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित दत्तात्रय काळे, तुकाराम मिसाळ,दतात्रय खाटीक, पुरुषोत्तम सर्जे, बाळासाहेब नवले ,नामदेव निकम ,बाजीराव मुंगसे ,राजेंद्र ढमढेरे ,अनिल मडके ,मधुकर वावरे ,देविदास पाटेकर, दत्तात्रय विधाटे, लक्ष्मण लंघे,रामनाथ राजापुरे, डॉ सुधाकर लांडे ,नानासाहेब मडके ,शिवाजीराव घोरपडे,डॉ.भास्कर खेडकर, शिवाजीराव मते,उद्धवराव नवले, ज्ञानदेव दहातोंडे ,दिलीपराव मोटे ,कुमार नवले, गणेश गव्हाणे ,संभाजी आगळे, मोहनराव गायकवाड, संतोष म्हस्के, दासकाका आगळे ,ॲड अजय रिंधे, भाऊसाहेब आगळे सुनील खरात, राजू परसैय्या, दिलीप सरोदे, हनुमंतराव गटकळ,अरुण देशमुख, आबासाहेब ताकटे, कचरूदास गुंदेचा, बबनराव भानगुडे ,अमृत फिरोदिया ,एकनाथ भुजबळ, बाबासाहेब आगळे ,मिलिंद गायकवाड, सुभाष पवार ,अशोक मेरड, काकासाहेब काळे ,अशोक धस , रामभाऊ पाउलबुधे, भाऊसाहेब चौधरी, गोरक्षनाथ कापसे,एकनाथ कावरे , भानुदास कावरे, भाऊसाहेब जावळे, राजू होंडे,
कारखाच्या मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, तांत्रिक सल्लागार एम.एस. मुरुकुटे,एस.डी.चौधरी,महेंद्र पवार, भगवान शेंडगे, सुधाकर ढाकणे, चीफ इंजीनियर राहुल पाटील, मुख्य लेखपाल रामनाथ गरड, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे यांचेसह सभासद वर्ग ,ऊस उत्पादक शेतकरी,विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी,कामगार वर्ग कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
संचालक काकासाहेब नरवडे यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.संचालक डॉ. नारायण म्हस्के यांनी आभार मानले.
*कामगारांना १३ टक्के बोनस..*
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन मा आमदार नरेंद्रजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मा आमदार चंद्रशेखर घुले पाटील उपाध्यक्ष मा आमदार पांडुरंग अभंग संचालक काकासाहेब नरवडे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे जनरल मॅनेजर रवींद्र मोटे कामगार अधिकारी डोहाळे व कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार अध्यक्ष अशोक मिसाळ कामगार संचालक सुखदेव फुलारी यांची बैठक होऊन कामगारांना १३ टक्के दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
—————————————




