नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुका विधी सेवा समिती, नेवासा तालुका वकील संघ, जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोशियन व अष्टविनायक ब्लड बँक अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या गुरुवार दि.२० नोव्हेंबर रोजी नेवासा न्यायालयाच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस रक्ताची अतिशय गरज असून विविध ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत असतात.त्याच पद्धतीने नेवासा न्यायालयाच्या वतीने ही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी स्व:इछेने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायधीश एच.आर वाघमारे, नेवासा तालुका वकील संघांचे अध्यक्ष ॲड.अजय रिंधे, जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनरचे अध्यक्ष ॲड.एल.डी. घावटे यांनी केले आहे.


