नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सपत्नीक मरोणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायत विविध समाज हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.या ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सपत्नीक मरोणोत्तर देह करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सरपंच श्री.आरगडे यांचे आजोबा कै. भानुदास मारुती आरगडे यांनी ही स्वतःचे मरणोत्तर देहदान केलेले आहे.
त्या नंतर त्यांचे वडील कॉ.बाबा आरगडे यांनी देखील मरणोत्तर देहादान करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत प्रवरा मेडिकल महाविद्यालय येथील फॉर्म भरून नावं नोंदणी ही केलेली आहे.आता त्यांच्या तिसऱ्या पिढीत देखील हा आदर्श निर्णय सरपंच शरदराव आरगडे आणि त्यांची पत्नी माजी सरपंच प्रियंका आरगडे यांनी घेतला आहे.तसेच त्यांच्या सोबत माजी उपसरपंच सचिन आरगडे यांनी देखील मरणोत्तर देहादानाचा निर्णय घेतला आहे.
याबाबद बोलताना सरपंच शरद आरगडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात मेडिकल महाविद्यालयात खुप मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी मानवाच्या मृत शरीराची आवश्यकता आहे. परंतु त्या प्रमाणात मृत शरीर उपलब्ध होत नाहीत.तसेच मृत्यू नंतर मानवाचे डोळे, किडनी, लिव्हर आदी अवयव निकामी झालेल्या आजारी असलेल्या लोकांना मिळाल्यास त्यांना जीवदान मिळू शकते. तसेच मृत्यू नंतर देखील अवयवच्या रूपाने मनुष्य जिवंत राहू शकतो मृत्यू नंतर शरीर जाळण्या ऐवजी ते दान करून कित्तेक लोकांचे जीव वाचू शकतात म्हणुन लोकांनी मरोणोत्तर देहादानाचा निर्णय घेतला पाहिजे .


