अहिल्यानगर/सुखदेव फुलारी
अहिल्यानगर शहरात डाॅ. संदीप गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इम्पल्स हॉस्पिटलचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते व महंत ह.भ.प. डाॅ. नामदेवशास्त्री महाराज,पद्मश्री पोपटराव पवार, आ. संग्राम जगताप,आमदार श्री. सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाले.

*ना.राधाकृष्ण विखे पाटील..
डाॅ.संदीप गाडे यांनी आपल्या गुणवत्ता, अनुभव आणि सेवाभावाच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेले इम्पल्स रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आधुनिक उपकरणे आणि रुग्णकेंद्रित सेवा यांसाठी निश्चितच अहिल्यानगर शहरासाठी एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार उपचार एका छताखाली मिळावेत, या उद्देशाने उभारलेले हे रुग्णालय निश्चितच समाजोपयोगी ठरेल असा विश्वास पालकमंत्री डॉ.विखे यांनी व्यक्त केला.

*ना.प्रा.राम शिंदे..
महाराष्ट्र विधान परिषदेचे.सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले, आज इंपल्स हॉस्पिटल या अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नवीन प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर व लोकार्पण सोहळ्यास, अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
या नव्या वास्तूमधून अहिल्यानगर व उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना हृदयरोग, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, ट्रॉमा केअर व आपत्कालीन सेवांसह दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.
आरोग्य सेवा हा केवळ व्यवसाय न राहता सामाजिक बांधिलकीचा भाग मानून इंपल्स हॉस्पिटलने रुग्णकेंद्रित सेवा देण्याचा जो संकल्प केला आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे.
या लोकार्पण सोहळ्यानिमित्त इंपल्स हॉस्पिटलचे संचालक मा. डॉ. संदीप गाडे तसेच संपूर्ण इंपल्स हॉस्पिटल परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा. नव्या वास्तूमधून हजारो रुग्णांना नवी आशा, नवे जीवन व नवी ऊर्जा मिळो, हीच सदिच्छा. अहिल्यानगरच्या आरोग्य क्षेत्राच्या बळकटीसाठी जनहिताचे असे उपक्रम सदैव समर्थपणे उभे राहतील अशी आशा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केली.

डॉ.गाडे भविष्यातील डॉ. नीतू मांडके-आ.सुरेश धस
आ.धस म्हणाले, करोना काळापासूनच सर्वाधिक जास्त विश्वास डॉ. संदीप गाडे यांच्यावर बसला. देशांमध्ये पूर्वी राजकीय नेते परदेशात जाऊन ओपन हार्ट सर्जरी करत होते. एकमेव बाळासाहेब ठाकरे असे नेते होते की त्यांनी स्वतःची ओपन हार्ट सर्जरी महाराष्ट्रात केली. ती सर्जरी करणारे डॉ. नीतू मांडके होते. भविष्यात डॉ. संदीप गाडे हे सुद्धा एक दिवस राज्याचे नीतू मांडके होऊ शकतात. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑनलाईन प्रक्रियेत काही हॉस्पिटल सहकार्य करीत नाहीत तर, काही हॉस्पिटलचे चांगले सहकार्य आहे. त्यामुळे त्यासंदर्भात पालकमंत्री विखे पाटील यांनी तात्काळ बैठक घेऊन तो प्रश्नमार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.
डॉ. संदीप गाडे… प्रास्ताविक करताना डॉ. संदीप गाडे म्हणाले की, हॉस्पिटलच्या उभारणीसाठी कुटुंबीयांसह सहकारी मित्र परिवाराने मोलाचे योगदान दिले. गेल्या बारा वर्षांमध्ये १६ हजार हृदयाच्या शस्त्रक्रिया केल्या.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, आ. संग्राम जगताप यांचे भाषण झाले.
डॉ. बाबा शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. महेश घुगे यांनी आभार मानले.
माजी आ.भीमराव धोंडे,माजी आमदार श्री.साहेबराव दरेकर, ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मनपा आयुक्त यशवंत डांगे, डॉ.संदीप सांगळे, डॉ.संजय घोगरे, श्री सुनील चव्हाण, श्री नवनाथ गाडे, सौ.फुलाबाई गाडे, डॉ.संदीप गाडे, डॉ.ज्योती गाडे, इंपल्स हॉस्पिटलचे संस्थापक मंडळ,सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, तांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते.
डॉ.संदीप गाडे, डॉ. ज्योती गाडे, डॉ. ईश्वर कणसे व डॉ. संजय वरुडे, डॉ.महेश घुगे, डॉ. सागर चौधरी, डॉ.ऋषीकेश पवार, डॉ. बी. बी. शिंदे, डॉ.विजय गाडे, डॉ.संदीप गायकवाड, डॉ.अतुल गुगळे,डॉ. सोनाली कणसे,डॉ.संदिप अनभुले,सिमोन बर्वे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.

डॉ.संदीप गाडे यांचा सन्मान करतांना डॉ.संतोष फुलारी व पत्रकार सुखदेव फुलारी


