Wednesday, May 13, 2026

भेंड्यातील दरोडयाची स्थानिक गुन्हे  शाखेकडून उकल

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छींद्र यशवंत बर्डे यांच्या भेंडा-तरवडी रस्त्यावरील वस्तीवर  मंगळवार दि.१० रोजी पहाटे अज्ञात  दरोडा टाकून  ३१ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व ७ तोळे ९ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. सदर दरोड्याचा तपास लावून आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

जयश्री दौलत बर्डे (वय ३३ वर्ष), रा.बर्डे वस्ती, भेंडा शिवार ता. नेवासा यांचे  फिर्यादी वरून नेवासा पोलिस ठाण्यात गु.र. नं.९९/२०२६ भान्यासं कलम ३१०(२) नुसार दि.१० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता.

पाथर्डी पोलीस ठाणे गु. र. नं. २७०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (२) या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे  पोनि  किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील  पथकातील सपोनि हरिष भोये, पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार, सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, शाहिद शेख, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब खेडकर, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे, चालक महादेव भांड, भगवान धुळे यांचे पथकला
गुप्त बातमीदारामाचे मार्फत सदरचा गुन्हा हा रेकार्डवरील आरोपी नामे बदाम काळे रा. शिरोडी ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर याने त्याचे साथीदारासह केला असुन तो सध्या त्याचे साथीदासह मजले चिंचोली गावचे शिवारातील संजय आव्हाड यांचे वस्तीवरील घरात असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पथकाने तात्काळ नमुद ठिकाणी मजले चिंचोली गावचे शिवारातील संजय आव्हाड यांचे वस्तीवर जावून जावुन सापळा रचुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे बदाम कडु काळे, वय २२ वर्षे रा. शिरोडी ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर,  साईनाथ विष्णु चव्हाण वय- २२ वर्षे रा. मुडदे वडगाव ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर,  ऋतिक हसमुख चव्हाण वय २० वर्षे रा. खोसपुरी ता.जि. अहिल्यानगर,  महेश उर्फ उमेश नंदु काळे वय २० वर्षे रा. खोसपुरी ता. जि. अहिल्यानगर,  भैय्या कड्डु काळे वय-२० वर्षे रा.शेकटा, ता. गंगापुर जि. अहिल्यानगर  लाकर करमत काळे वय २६ वर्षे रा. शेकटा ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले आहे. आरोपी नामे बदाम काळे यास विश्वासात घेवुन गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने नमुद गुन्हा साथीदासह केल्याचे कबुली देवुन गुन्हा करते वेळी त्याचे सोबत ७ताराचंद विरुपण भोसले रा. गाजगाव ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर (फरार) बोट्या उषा भोसले रा. अंतापुर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर (फरार)  तिरंगा कडु काळे रा. शिरोडी ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर (फरार) असे असल्याचे सांगितले आहे.

ताब्यातील आरोपीचे कब्जातुन १० लाख २५ हजार रुपये कि.चे ६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, ४६ हजार रुपये कि.चे ६ वेगवेगळे कंपनीचे मोबाईल, ५०० रुपये कि.चे एक चाकु, एक गलोर, एक लोखंडी कत्ती, एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी भाला असे एकुण १० लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने भेंडा येथील दरोड्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!