नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील श्री.रेणुकामाता व शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या १५ जागेकरिता सोमवार दि.२३ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत भक्ती गड विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथे रेणुकामाता व श्री शैनेश्वर देवस्थानला क-वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असून या देवस्थानच्या ट्रस्ट धर्मदाय उपआयुक्त कार्यालय, अहिल्यानगर येथे
नोंदणी झालेली आहे. ट्रस्ट नोंदणी करताना या देवस्थानावर ग्रामसभेत सर्वानुमते बिनविरोध निवड करून पहिले विश्वस्त मंडळ स्थापन झाले होते.मात्र काही काळानंतर विश्वस्त निवडीवरून वाद निर्माण होईल हे प्रकरण धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात गेले.त्यावर अनेक सूनवण्या होऊन गुरुवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी धर्मदाय उपआयुक्त कार्यालयातील निरीक्षक
उमेश जाधव यांचे उपस्थितीत गोंडेगाव ग्रामपंचायत ग्रामसभा झाली. मात्र या ग्रामसभेत विश्वस्त मंडळ निवडी बाबद एकमत होऊन न शकल्याने अखेर नवीन विश्वस्त मंडळ नेमणुकीसाठी मतपत्रिकेवर निवडणूक प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या सोमवार दि.२३ मार्च रोजी दुपारी १२ ते ५ यावेळेत मतदान घेण्यात आले.ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत असलेले एकुण १ हजार २१९ मतदारांपैकी ९६६ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला.मंगळवार दि.२४ मार्च रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालय, अहिल्यानगर येथे मतमोजणी झाली.
त्यात गोंडेगाव भजनी मंडळ विकास पॅनलचा पराभव करीत भक्ती गड विकास पॅनलचे विजयी झालेले उमेदवार व त्यांना पडलेली मते अशी…
अशोक नारायण पाठक(५१५ ),
अनिल उत्तम सुसे(५६५),अंबादास जनार्दन तुपे(५४२), बाबासाहेब गिननदेव सरोदे(५३०),चंद्रकात आसाराम वाघुले(५००),दिलीप मधुकर वाघुले(५०६),हिरामन श्रीपती गोरे(५११), मथुरा रामभाऊ रोडगे(५३०),पांडूरंग विठोबा रोडगे(५१०),राजु ज्ञानदेव पवार(५१०),संजय सुखदेव अढागळे५०७) ,संजय कारभारी कर्डीले(५३०), संतोष रावसाहेब गारुडे(४८९), शिवाजी भाऊराव रोडगे(५३३),सोपान दिगंबर तुपे(५००) हे १५ उमेदवार विजयी झाले आहेत.
उपसरपंच संतराम रोडगे, तुळशीराम तुपे,मधुकर वाघुले,मोहन रोडगे, रमेश रोडगे,भागचंद रोडगे,दत्तात्रय तुपे, मच्छिंद्र सुसे, अशोक सुसे, अमोल गारुडे, गोरक्षनाथ गारुडे, बाबासाहेब गारुडे, लक्ष्मण धाडगे, दत्तुभाऊ घुले, बापूसाहेब वाघुले, सतीष पाठक, मच्छिंद्र तुपे, सोपान पवार, रमेश पवार, बापु रोडगे, देवराव रोडगे, विठ्ठल जामकर, जगन्नाथ देशमुख, अर्जुन वाघुले,लक्ष्मण तुपे, मंजु रोडगे, साहेबराव रोडगे,लक्ष्मण घुले यांनी भक्ती गड विकास पॅनलचे विजयासाठी परिश्रम घेतले.
धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक उमेश जाधव हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.



