Tuesday, March 31, 2026

अहिल्यानगर मुळा पाटबंधारे विभागाचा  सगल ६ व्या वर्षी १०० टक्के पाणीपट्टी वसुलीचा विक्रम

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

जलसंपदा विभागाचे अहिल्यानगर मुळा पाटबंधारे विभागाने ३१ मार्च २०२६ अखेर सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली करून पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला असून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात १६८९.६६ लक्ष रुपये वसुलीचे उद्दिष्ट असताना ही ३३४५.८८ लक्ष रुपयांची (१९८ टक्के) वसुली केल्याची माहिती कार्यकारी अभियंता कु. सायली पाटील यांनी दिली.

अधिक माहिती देताना कु. पाटील यांनी सांगितले की, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर या विभागाने आतापर्यंतची सर्वात जास्त व विक्रमी सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली करून पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यासाठी विभागातील प्रत्येकाने आपापले योगदान दिले आहे. त्यामुळे आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करू शकलो. मागील दोन वर्षांपासून सातत्याने विक्रमी पाणीपट्टी वसुली करीत आहोत. सलग ६ व्या  वर्षी आपण १०० टक्क्यांपेक्षा जास्त वसुली करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्व उपविभागीय अभियंता, अधिकारी, शाखाधिकारी, कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून आणि सर्व क्षेत्रीय कर्मचारी, विभागीय कार्यालयातील आणि उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांचे आभार.

तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक आणि अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,नाशिक, सर्व सिंचन व बिगर सिंचन संस्था आणि लाभधारकांचे यांचे मनःपूर्वक आभार.भविष्यात देखील पुनःश्च आपणाकडून अशीच कामगिरी होईल अशी आशा ही पाटील यांनी व्यक्त केली.

२०२५-२६ या आर्थिक वर्षात  वसुलीचे उद्दिष्ट व प्रत्यक्ष झालेली वसुली अशी…

———————————————————
तपशील–उद्दिष्ट (रु.लक्ष)–साध्य उद्दिष्ट(रु.लक्ष) — वसूली टक्के
——————————————————–

सिंचन– २३३.११–२१८.०१– ९४ टक्के

बिगर सिंचन– १४५६.५५– ३१२७.८६– २१५ टक्के
——————————————————-
एकूण– १६८९.६६– ३३४५.८८– १९८ टक्के
——————————————————–

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!