नाशिक/सुखदेव फुलारी
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे पालखेड पाटबंधारे विभागाने अलग ५ व्या वर्षी ३१ मार्च २०२६ अखेर सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी १०० टक्के वसुलीचा विक्रम प्रस्थापित केला असून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात
१९७४.६० लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट असताना ही २३९६.४५ लाख रुपयांची (१२१ टक्के) वसुली केल्याची माहिती कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली.
अधिक माहिती देताना श्री.भागवत यांनी सांगितले की,पालखेड पाटबंधारे विभाग मागील चार वर्षापासून आपण सातत्याने विक्रमी पाणीपट्टी वसूली करीत आहोत. सलग पाचव्या वर्षी देखील आपण सिंचन वसूली १२१% व बिगर सिंचन १२१ % असे एकुण १२१% वसूली केली आहे.
उद्दिष्टपूर्तीसाठी अथक प्रयत्न करणारे सर्व सहाय्यक अभियंता श्रेणी-१, उपविभागीय अभियंता-अधिकारी, शाखाधिकारी, दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक सर्व सिंचन व्यवस्थापनेतील क्षेत्रीय कर्मचारी तसेच विभागीय कार्यालयातील आणि उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच उद्दिष्टपूर्तीसाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता व प्रशासक,
सर्व सिंचन व बिगर सिंचन संस्था आणि लाभधारकांचे मनःपूर्वक आभार.भविष्यात देखील पुनःश्च अशीच कामगिरी होईल, अशी खात्री
ही श्री.भागवत यांनी व्यक्त केली.
*२०२५-२६ या आर्थिक वर्षात वसुलीचे उद्दिष्ट व प्रत्यक्ष झालेली वसुली अशी…*
———————————————————-
तपशील–उद्दिष्ट (रु.लक्ष)–साध्य उद्दिष्ट(रु.लक्ष) — वसूली टक्के
———————————————————–
सिंचन– १४१.९८– १७१.३५– १२१ टक्के
बिगर सिंचन– १८३२.६२– २२२५.१०– १२१ टक्के
——————————————————-
एकूण–१९७४.६०– २३९६.४५– १२१ टक्के
——————————————————-



