Wednesday, May 27, 2026

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत दया-अब्दुलभैया शेख

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभे पीक, फळबागा तसेच साठवलेला शेतीमाल पूर्णपणे बाधित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांच्या समोर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अब्दुलभैया शेख यांनी केली आहे.

श्री.शेख पुढे म्हणाले की,आर्थिक मदत वाटप प्रक्रिया जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने राबवून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यास मोठा दिलासा मिळेल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!