Tuesday, May 26, 2026

कोपरगावच्या वैष्णवी लोखंडे व अनामिका आहेर यांची राज्य ड्रॉप रोबॉल संघात निवड

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

कोपरगाव/गौरव डेंगळे

कोपरगाव शहरासाठी अत्यंत अभिमानाची बातमी समोर आली आहे. सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथील वैष्णवी लोखंडे व अनामिका आहेर या दोन गुणवंत विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्र राज्य ड्रॉप रोबॉल संघात स्थान मिळवले आहे.

दि.२ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान गाझियाबाद येथे होणाऱ्या १७व्या राष्ट्रीय ड्रॉप रोबॉल स्पर्धेसाठी वैष्णवी लोखंडे व अनामिका आहेर या विद्यार्थिनींची महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीमुळे शाळेचा तसेच कोपरगाव शहराचा मान उंचावला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल सोमैया ट्रस्टचे अध्यक्ष समीर सोमैया,गोदावरी बायो रिफायनरीचे सुहास गोडगे साहेब,प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर,तसेच पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे, नाथलीन फर्नांडिस आणि क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशामागे प्रशिक्षक गणेश वाघ व गणेश मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळेच या विद्यार्थिनींनी राज्य पातळीवर आपली छाप पाडत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.कोपरगावच्या या कन्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर खेळाडूंना प्रेरणादायी ठरणारे आहे.आता राष्ट्रीय स्पर्धेतही त्या उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!