Wednesday, April 15, 2026

अतिरिक्त घोडेगाव तहसीलच्या तहसीलदार म्हणून सोनाली मात्रे यांची नियुक्ति

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-02 at 7.54.58 PM
previous arrow
next arrow
Shadow

15/4/26:अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव तालुका निर्मितीचा मार्ग झाला मोकळा, असून नेवासा तालुक्यातील अतिरिक्त घोडेगाव तहसीलच्या तहसीलदार म्हणून उपजिल्हाधिकारी सोनाली मात्रे यांची नियुक्ति जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केली आहे.

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अतिरिक्त तालुका निर्मितीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, शासनाने सोनाली मात्रे यांची प्रथम महिला तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधीर वैरागर यांनी गेल्या तेरा वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे. या नवीन तालुक्यासाठी आवश्यक असलेली ३४ एकर शासकीय जागा उपलब्ध असून, ग्रामपंचायतींचे ठराव आणि भूमी अभिलेख विभागाची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिफारस या कामी महत्त्वपूर्ण ठरली. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार, १० एप्रिल २०२६ पासून सोनाली मात्रे या चांदा, सोनई, घोडेगाव, वडाळा बहिरोबा आणि देडगाव या महसूल मंडळांचा कारभार पाहणार आहेत. घोडेगाव परिसरातील नागरिकांची प्रशासकीय कामे सुलभ व्हावीत आणि स्थानिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने ही तालुकानिर्मिती करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे घोडेगाव परिसरात सध्या जल्लोषाचे वातावरण असून नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!