नेवासा/प्रतिनिधी
राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व शाश्वत करण्याच्या उद्देशाने चोंडी येथून सुरु झालेल्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे
आज दि.२६ रोजी नेवासा तालुक्यातील आगमन होत आहे.
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा संकल्प घेऊन जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथे दि.२५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा तथा पालकमंत्री
राधाकृष्ण विखे पाटील, आमदार
विठ्ठलराव लंघे यांचे उपस्थितीत
‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचा शुभारंभ झाला. सदर जलयात्रा रविवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ९वाजता नेवासा तालुक्यात दाखल होत आहे. प्रथम घोडेगांव येथे जलदिंडीचे स्वागत-औक्षण करून फटाकेची अतिषबाजी करत जेसीबीच्या सहाय्याने पुष्प वृष्टी करण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता नेवासा फाटा येथे
आमदार विठ्ठलराव लंघे यांचे हस्ते
जलदिंडीचे स्वागत होईल. नेवासा फाटा ते नेवासा मळगंगा देवी चौक
मोटार सायकल रॅली, सकाळी १०:१५ वाजता मळगंगा देवी चौक येथे आगमन व खोलेश्वर गणपती मंदिर चौका पर्यंत जलदिंडीची ढोल-तशा,टाळ पथकासह पायी मिरवणूक,सकाळी १०:३० ते ११ वाजता जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
उपस्थितीत खोलेश्वर गणपती मंदिर चौकात जलदिंडीतील मान्यवरांचा सत्कार, औक्षण व कलश स्विकारणे, फटाके अतिषबाजी व जे.सी.बी.च्या सहाय्याने पुष्प वृष्टी करणेत येईल,सकाळी ११:१५ वाजता जलदिंडी मिरवणूक / पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंदिर दर्शन,
त्यानंतर सकाळी ११:३० ते १२:३० वाजता नेवासा ते श्रीरामपूर प्रस्थान होणार आहे.




