Saturday, June 13, 2026

नेवासा पोलीसांची कारवाई;पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्यासह जेरबंद

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत नेवासा पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये एका पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीचा तांत्रिक छडा लावत पोलीसांनी त्याला गावठी कट्टा आणि ४ जिवंत काडतुसासह रंगेहात अटक केली आहे.आदिनाथ गोरख ढगे (वय २६ वर्ष) रा. खेडले काजळी ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिली.

पोलीस अधीक्षक श्री.एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या आदेशान्वये दि. १०/०६/२०२६ रोजीच्या ऑल आऊट ऑपरेशन मोहिमे अंतर्गत पोलीस पथक फरार व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध मोहिम सुरु होती. या दरम्यान नेवासा ठाण्यातील गु.र.नं. ३०९/२०२६ भा.न्या संहिता कलम ७८, ३५२ सह पोक्सो कलम ८, १२ प्रमाणे मधील फरार आरोपी आदिनाथ गोरख ढगे याचा नेवासा पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरु होता.

आरोपीबाबत तांत्रिक विश्लेषण करात तो सोनई ता. नेवासा येथे असल्याचे खात्रीशीर माहिती समजताच पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पो. उपनिरीक्षक विकास पाटील व पथक यांना तात्काळ सोनई येथे रवाना केले. सोनई येथे आरोपीस पोलीसांची चाहुल लागताच त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने शिताफीने पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला बेकायदेशीर रित्या बाळगलेला गावठी कट्टा मॅगझीन लोड केलेले ०४ जिवंत राऊंड सह मिळुन आला.आरोपीकडे सदर अग्निशस्त्राबाबत कोणताही परवाना नसल्याने त्याच्याविरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९८/२०२६ शस्ञ अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.एम.सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वात पो. उपनिरीक्षक विकास पाटील, पोकॉ नारायण डमाळे, पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ अतुल शेळके आणि पोकॉ परमेश्वर गहाळ यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!