Saturday, June 13, 2026

हंडीनिमगाव शिवारात वेश्या व्यवसाय करुन घेणारे आरोपी केले जेरबंद

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रताप दराडे यांनी नियुक्तिच्या पहिल्याच दिवशी धडाकेबज कारवाई करत नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील हंडीनिमगाव शिवारातील श्री हॉटेल लॉजिंग मध्ये छापा टाकुन महिलांकरवी वेश्या व्यवसाय करुन घेणारे आरोपी जेरबंद केले.

याबाबद अधिक माहिती अशी की, दि. १२.०६.२०२६ रोजी दुपारी ४:३५ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हंडीनिमगाव शिवारातील श्री हॉटेल / लॉजिंग येथे महिलांकरवी वेश्या व्यवसाय करुन घेत आहे अशी खात्रीलाय बातमी मिळाले वरुन त्यांनी तात्काळ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर श्री हॉटेल/लॉजिंग या ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकुन कारवाई करणेबाबत मार्गदशर्न व सुचना देवुन शिताफीने छापा टाकला असता, सदर ठिकाणी आरोपी नामे मल्हारी शंकर नगरे (वय 34 वर्षे), व्यवसाय मजुरी रा. खंडोबा मंदीर खुपटी रोड नेवासा ता. नेवासा, सतिष दिलीप मेटे.(वय 30 वर्षे), व्यवसाय मजुरी रा. बेलापुर ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, लखन राजेंद्र भणगे, (वय 25 वर्षे), रा. हंडीनिमगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर (मालक) काही पिडीत महिलांकरवी वेश्या व्यवसाय करुन घेत असताना मिळुन आल्याने त्यांच्याविरुध्द पंचनामा कारवाई करुन नेवासा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असुन त्यांच्याविरुध्द महिला पोलीस अंमलदार भारती पवार यांची फिर्याद घेवुन भारतीय न्याय संहिता कलम 143(3) सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

तरी यापुढे पोलीस स्टेशन नेवासा हद्दीमध्ये अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर छापेमारी करुन कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे तसेच यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंदे चालकांवर कारवाई चालु राहणार आहे ठणकावून सांगितले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर सोमनाथ वाकचौरे व उप विभागीय पो. अधिकारी नीरज राजगुर यांचे सुचना मागदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोउपनि विकास पाटील, पोहेकॉ अजय साठे, पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ नारायण डमाळे, पोकॉ श्रीनाथ गवळी, मपोकॉ भारती पवार, मपोकॉ गिता पवार यांनी कलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!