Monday, July 27, 2026

गुहा येथे सावता माळी शेतकरी गटाकडून वृक्षारोपण

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

पत्रकार राहुल कोळसे:पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सावता माळी शेतकरी गट, गुहा यांच्या वतीने प्रवरा माध्यमिक विद्यालय, गुहा येथे वृक्षरोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील , उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी पंकज कडू , प्रसाद धामोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. घेत

 

यावेळी सावता माळी शेतकरी गटाचे सदस्य गोरख शिंदे, संदीप शिंदे, विजय शिंदे, अनिल शिंदे, पोपट शिंदे, मोहन साळुंखे, ओम शिंदे, प्रसाद शिंदे,जालिंदर माळी, गोरक्षनाथ सजन, समर्थ शिंदे, रवींद्र शिंदे, तेजस शिंदे व दिगंबर शिंदे उपस्थित होते. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी केले

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!