Monday, August 10, 2026

कामिका एकादशीनिमित्त ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

कामिका एकादशीनिमित्त रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर खिचडी प्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी श्री ज्ञानेश्वर देवस्थानचे महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, महंत प्रकाशानंदगिरी महाराज, देवस्थानचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, कैलासराव जाधव, मुळाचे चेअरमन भाऊसाहेब मोटे, व्हा. चेअरमन बाळासाहेब पाटील, लक्ष्मणराव जगताप, संतोष फिरोदिया, अशोकराव नांगरे, मच्छिंद्र कडू, राजेंद्र सानप, त्रिंबक सुकाळकर, दिनकर घावटे, जालु गवळी, विशाल सुरडे, कैलास काळे, बाबासाहेब मोरे, संभाजी धोत्रे, स्वप्नील मापारी, भरत काळे, पांडुरंग निपुंगे, कैलास झगरे, डॉ. राहुल चव्हाण, राजेंद्र काळे, भीमाशंकर वरखडे, महादेव तांदळे, महादेव गडाख, बबनराव नागोडे, लालचंद मते, असिफ पठाण, वसंत टेकाळे, सुनील झीने, बाळासाहेब नवले, महंमद आतार, पत्रकार विजय गांधी, बंडू नेहे,अनिल वाघ, वैभव थिटे, बाळासाहेब कोकणे, बाळासाहेब मारकळी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री ज्ञानेश्वर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामिका एकादशीनिमित्त भाविकांना प्रसाद वाटपाचा हा उपक्रम श्रद्धा व सेवाभावाचे दर्शन घडविणारा ठरला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!