भेंडा(नेवासा)
या वर्षिच्या गळीत हंगामात १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ५३ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन व ऊस गळीत हंगाम शुभारंभ गुरुवार दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष
माजी आ. पांडुरंग अभंग, अड.देसाई देशमुख, कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला,त्यावेळी आयोजित सभेत श्री.घुले बोलत होते.
कारखान्याचे माजी संचालक काशिनाथ नवले,पद्माकर मते, शिवाजीराव कोलते, सखाराम लव्हाळे,
विष्णू जगदाळे,रावसाहेब निकम, ज्ञानदेव दहातोंडे, चंद्रकांत गरड, विद्यमान संचालक डॉ.नारायण म्हस्के,पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ,दत्तात्रय काळे, जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अड.हिम्मतसिंह देशमुख,अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, तज्ञ संचालक रवींद्र नवले,कामगार संचालक सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,जनरल मॅनेजर रविंद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे संचालक प्रसाद पटारे व सौ.गौरी पटारे आणि बॉयलर अटेंडेंट श्री.संजय नवले व सौ.वैशाली नवले यांचे हस्ते बॉयलर पूजन करण्यात आले.
तसेच संचालक जनार्दन शेळके व सौ.शांताबाई शेळके यांचे हस्ते ऊस गव्हाण पूजन तर शेतकी ओव्हरशीअर श्री.शरद गव्हाणे व सौ.शिल्पा गव्हाणे यांचे हस्ते ऊस वजन काट्याची विधिवत पूजा करण्यात आली.
श्री.घुले पुढे म्हणाले की, अलनीनोचा परिणाम सर्व देशावर झाला असून त्याला आपणही अपवाद नाहीत, अशा प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन एकमेकाला प्रेरणा देत आपल्यातील
कौशल्य आणि गुणवत्तेचा वापर या सहकारी संस्थेसाठी जास्तीत जास्त कसा करता येईल हेच आता आपल्या हातात आहे. १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप होणारच यासाठी सर्वांनी सामूहीक प्रयत्न करण्याची गरज आहे. कोणी कुठेही वजन केले तरी आपल्या वजन काट्यावरील ऊस वजनात एक किलोचाही फरक पडणार नाही,इतकी अचूकता आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविल्यास
कमी खर्चात सहज रित्या ग्रॅव्हिटीने पाणी मिळेल आणि नगर, नाशिकसह मराठवाड्यातील १० जिल्ह्यांचा दुष्काळ कायम स्वरूपी हटविण्यासाठी मदत होईल.
संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग व माजी संचालक अड.देसाई देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,डॉ.शिवाजी शिंदे,
मोहनराव गायकवाड, गणेश गव्हाणे, नामदेव निकम, बलभीम फुलारी, किसन यादव, संदीप फुलारी,
संभाजीराव माळवदे,शेषराव साबळे,
बाबूलाल पटेल, दत्तात्रय माळवदे, जनार्दन कदम, भानुदास कावरे, काकासाहेब लबडे, रामदास काळे, नारायण गढेकर, दादा गजरे, बाळासाहेब वाघडकर, अंबादास गोंडे, दत्तात्रय खाटीक, अशोक दुकळे, संभाजी आगळे, बाबासाहेब आगळे, राजू परसय्या, दत्तात्रय विधाटे, आप्पासाहेब देशमुख, सुदाम खाटीक, राम घुमरे, आबासाहेब ताकटे, गोरक्षनाथ बर्गे, संभाजी पवार, दादासाहेब वाबळे, बाबासाहेब आगळे, संतोष म्हस्के, हरिभाऊ नवले,अशोक मेरड, किशोर मिसाळ,अड.रवींद्र गव्हाणे, पुरुषोत्तम सर्जे, सोपान महापूर,भारत गुंजाळ, विनोद ढोकणे, सुभाष म्हस्के, शरद मिसाळ, शंकर निकम,हनुमान पातकळ, गणेश खंबरे, भाऊसाहेब चेके, शहादेव खोसे, तुकाराम विघ्ने, दिलीप कुंढारे, विश्वनाथ मते, पोपट मते,
कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, तांत्रिक सल्लागार एम.एस.मुरुकुटे,एस.डी.चौधरी, महेंद्र पवार,भगवंता शेंडगे,सुधाकर ढाकणे, वर्क्स मॅनेजर राहुल पाटील, चीफ इंजिनिअर नंदकुमार चोथे, चीफ केमिस्ट सतिष शिंदे, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के,मुख्य लेखापाल रामनाथ गरड,पर्यावरण अधिकारी राजेश वावरे,
कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, लीगल ऑफिसर सुनिल शिंदे, राजेंद्र काकडे, नामदेव मुळे, विवेक जगदाळे, यांचेसह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी,कामगार वर्ग कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील यांनी प्रस्ताविक केले.
भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले.संचालक रामनाथ राजपुरे यांनी आभार मानले.


