Sunday, December 22, 2024

मोठा निर्णय:मनोज जरांगेना २४ तास सरकारी सुरक्षा 

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा लावून धरला आहे.

काही आठवड्यांपूर्वी जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यावेळी शिंदे सरकारने सर्व मागण्याही मान्य केल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून दोन कॉन्स्टेबलची सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे यांना आता जिल्ह्यातील पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जात होती.मनोज जरांगे यांना आता कायमस्वरूपी दोन पोलीस कॉन्स्टेबलची सुरक्षा पुरवली जाणार आहे. गोदी पोलिस स्टेशनच्या

दोन कॉन्स्टेबलची नियुक्ती ही केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने जरांगे यांच्या सुरक्षेसाठी २४ तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. सकल मराठा समाजाकडून

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आली होती.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!