Friday, May 17, 2024

महाराष्ट्राला पावसाचा इशारा या जिल्ह्यात येलो अलर्ट तर थंडीही वाढणार…

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज वायव्य भारताला ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सामना करावा लागेल. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. भारतीय हवामान

विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीमध्ये सकाळच्या वेळी दाट ते अत्यंत दाट धुके दिसण्याची शक्यता आहे. त्यासोबत काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही भागात तुरळक पाऊस

पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, वीकेंडच्या पावसानंतर देशात थंडीचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्राकडे वारे वाहत आहेत.

यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय औरंगाबादला IMD कडून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने म्हटलं आहे की, वायव्य भारतात नव्या सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामान काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा शनिवारपासून वायव्य

भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल, असंही आयएमडीने (IMD) म्हटलं आहे. तसेच, हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्ये

आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशातही आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

आयएमडीच्या अंदाजानुसार, 4 आणि 5 फेब्रुवारी दरम्यान, जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रदेशांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी

होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थानमध्ये तसेच उत्तर मध्य प्रदेशात आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!