Sunday, December 22, 2024

नगर राईझिंग मॅरेथॉन स्पर्धेत डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले ६९ मिनिटात १० किमीचे अंतर पार

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून नगर येथे आयोजित केलेल्या “मॅक्सिमस नगर राईझिंग हाफ मॅरेथॉन” स्पर्धेत भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी अवघ्या ६९ मिनिटात १० किलो मिटरचे अंतर पार केले.

नगर येथील नगर रायझिंग फाउंडेशन,मॅक्सिमस स्पोर्ट्स अकॅडमी व शांतीकुमार फेरोदीया मेमोरियल फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि.४ फेब्रुवारी रोजी सकाळी अहमदनगर क्लब येथे जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आयोजित केलेल्या
“हम फिट तो नगर फिट” स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत डॉ.नरेंद्र फिरोदिया, डॉ.शाम तारडे,डॉ.सतीश सोनवणे आदींसह विविध वयोगटातील तरुण,जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या मॅरेथॉनमध्ये माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी सलग ५ व्या वर्षी १० किलोमीटरचे अंतर अवघ्या ६९ मिनिटात पार करून युवा पिढीसमोर व्यायामा बद्दलचा एक आदर्श ठरला आहे.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचे हस्ते गौरव पदक श्री.घुले यांना प्रदान करण्यात आले.श्री.घुले हे युवकांसाठी नेहमीच मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. एक राजकीय व्यक्ती असून देखील रोजच्या धावपळीत सुद्धा सकाळी उठून व्यायाम करतात.

*वय वाढत जाते तसा तो निरोगी बनत जातो तोच खरा युवक- मा.आ.नरेंद्र घुले पाटील*

यावेळी बोलतांना श्री.घुले म्हणाले की,
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी जीवन जगता आले तर सर्व काही साध्य होते. व्यायाम व धावणे हे निरोगी जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.वय वाढत जाते तसा तो निरोगी बनत जातो तोच खरा युवक.
युवकांनी नेहमी तरुण वयात व्यसनांच्या आहारी न जाता व्यायामालाच आपले व्यसन बनवा. आपला फिटनेस म्हणजेच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.ती टिकवण्यासाठी व्यायाम करायलाच हवा असे माजी आ.नरेंद्र घुले पाटील म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!