Saturday, June 22, 2024

नेवासा तालुक्यातील तरुणाला गावठी कट्टयासह अटक तर एक जण फरार

IMG-20240425-WA0005
IMG-20240620-WA0001
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

गावठी कट्टया व जीवंत काडतुस बाळगण्या प्रकरणी नेवासा तालुक्यातील मोरे चिंचोरा येथील ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (वय ३३ वर्षे) यास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर कुकाणा येथील भैया शेख (पुर्ण नांव माहित नाही) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

त्यानुसार पोनि दिनेश आहेर हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदाराकडून दि. ०३/०२/२०२४ रोजी इसम नामे विकास सुधाकर सरोदे रा. राहुरी हा व त्याचा साथीदारासह शेंडी बायपास या ठिकाणी व इसम नामे ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट रा. नेवासा व त्याचा साथीदारासह नागरदेवळे गावचे शिवारात कापुरवाडी गावाकडे जाणारे रोडवर गावठी कट्टे (अग्निशस्त्र) विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे दोन स्वंतत्र पथके नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आवश्यक सुचना देवुन पथके रवाना केली.

नमुद सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, संदिप चव्हाण, संतोष खैरे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड संभाजी कोतकर, प्रमोद जाधव, अरुण मोरे, यांनी अहमदनगर ते छ. संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास या ठिकाणी सापळा लावुन आरोपी नामे विकास सुधाकर सरोदे (वय २३ वर्षे), रा. गुंजाळे ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये ०१ गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व ०२ जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार नामे लखन सुधाकर सरोदे रा. गुंजाळे ता. राहुरी, जि. अहमदनगर हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.

दरम्यान मिळालेल्या बातमीतील ठिकाणी नागरदेवळे गावाचे शिवारात वारुळवाडी गावाकडे जाणारे रोडवरुन आरोपी नामे ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट (वय ३३ वर्षे), रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवुन त्याचे अंगझडतीमध्ये ०१ गावठी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) व ०२ जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याचा साथीदार नामे भैया शेख पुर्ण नांव गांव माहित नाही. रा. कुकाणा, ता. नेवासा, जि. अहमदनगर हा सदर ठिकाणावरुन पळुन गेला आहे.
वरील दोन्ही ठिकाणावरुन आरोपी नामे विकास सुधाकर सरोदे व ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट यांचे कब्जामध्ये ०२ गावठी बनावटीचे कट्टे (अग्निशस्त्रे) ०४ जिवंत काडतुस असा एकुण ६२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचेविरुध्द
१) एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे
गु.र.नं. १११/२०२४ आर्म अॅक्ट कायदा कलम ३/२५, ७ प्रमाणे २) भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. ९९/२०२४ आर्म अॅक्ट कायदा कलम ३/२५, ७ प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपी नामे ठकन उर्फ नितीन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे, जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, जबरी चोरी, अवैध शस्त्रे बाळगणे, दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे….

एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम ११२/२०१५ भादवि कलम ३९५, ३९४, ४२७, ३४, नेवासा पोलिस स्टेशन ९१५/२०२२ भादवि कलम ३९४, ३४,

सोनई पोलिस स्टेशन २९८/२०२२ भादवि कलम ३०७, ३२४, ५०६, आर्म अॅक्ट ३/२५,सोनई पोलीस स्टेशन ३५२/२०२१ भादवि कलम ३०७, ३२४ आर्म अॅक्ट ४/२५,सोनई पोलिस स्टेशन ३२६/२०२१ भादवि कलम ३२४, ३२३,सोनई पोलीस स्टेशन ३३७/२०२१ भादवि कलम ४५२, ३२४,सोनई पोलिस स्टेशन ६०/२०१४ आर्म अॅक्ट ४/२५, येरवडा पोलीस स्टेशन १५६/२०१७ भादवि कलम ३६३, ३६६ (अ), ३७६, सोनई पोलीस स्टेशन
०३/२०१७ दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!