Wednesday, February 21, 2024

नेवासा-श्रीरामपुर रस्त्यावर मोटरसायकल व ट्रकचा अपघात;एक जण ठार

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

मोटारसायकलला पाठी मागुन जोराची धडक देऊन अपघातास, मोटारसायकलचे नुकसानीस व एकाचे मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना आज सोमवार दि.12 फेब्रूवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नेवासा बुद्रुक शिवारात घडली.

याबाबद किशोर बबन आहेर (वय 26 वर्ष), मजुरी. रा. भोकर, ता. श्रीरामपुर यांनी आत्मदिप हॉस्पीटल नेवासा फाटा येथील आय.सी.यु. वार्ड मधे औषधोपचार घेत असतांना पूर्णपणे शुद्धीयर असताना पोलिसांना जबाब लिहुन दिला की, दि. 12/2/2024 रोजी सकाळी 11 वाजेचे सुमारास माझे गावातील माझा मित्र कैलास उल्हास आमोलीक रा. भोकर, ता. श्रीरामपुर याचे मालकीची प्लॅटीना मोटारसायकल घेउन वडाळा बहिरोबा ता. नेवासा येथे आमचे मित्राचे लग्न असल्याने निघालो होतो. मी मोटारसायकल चालवत होतो, माझे पाठीमागे माझा मित्र कैलास
उल्हास अमोलीक हा बसलेला होता. आम्ही नेवासा मार्ग निघालो होतो, आम्ही नेवासा बुद्रुक गावचे शिवारातुन आमचे
बाजुने जात असताना 11:30 वाजेचे सुमारास आमचे पाठीमागुन एक मोठा चारचाकी ट्रक भरधाव वेगाने येउन त्याने
आमचे मोटारसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने आम्ही त्या ट्रकखाली आल्याने ट्रकचालकाने त्याचे
ताब्यातील ट्रक पुन्हा वेगाने चालवुन मला मोटारसायकलसह फरफटत नेले होते. माझे पाठीमागे बसलेला माझा मिস
कैलास उल्हास अमोलीक याचे अंगावरुन ट्रक गेल्याने तो गंभीर जखमी होउन जागीच मयत झाला आहे. त्यांनंतर
मला तेथील लोकांनी अॅम्बुलन्समधुन दवाखान्यात नेवासा फाटा येथे औषधोपचार कामी दाखल केले आहे.

दवाखान्यात दाखल केलेनंतर तेथे माझे माना सुरेश वाकडे हे आले होते तेव्हा त्यांचेकडुन मला त्या ट्रकचालकाचे
नाव समाजले असुन त्याचे नाव आप्पासाहेब लक्ष्मण साबळे, रा. देवटाकळी ता. शेवगाव, असे असुन व्याचे ट्रकचा नंबर एम.एच. 16 ए.ई 9207 असा आहे. तरी आज दि 12/2/2024 रोजी सकाळी 11:30 वाजेचे सुमारास मी व माझा मित्र कैलास उल्हास अमोलीक, रा.भोकर ता श्रीरामपुर असे आम्ही माझा मित्र कैलास याचे प्लॅटीना मोटारसायकलवरून बडाळा बहिरोबा, ता. नेवासा येथे लगाकरीता जात असताना आम्ही नेवासा बुद्रुक शिवारात जात असताना आमचे मोटारसायकलला ट्रक क्र.एम. एच. 16 ए.ई.9207 हीवरील चालक नाथ आपासाहेब लक्ष्मण साबले रा. देवटाकळी, ता. शेवगाव याने त्याचे ताब्यातील एक ही भरधाव वेगाने चालवुन, रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन आमचे मोटारसायकला पाठीनगुन जोराची धडक दिल्याने आम्ही त्या ट्रकखाली आल्याने ट्रकचालकाने त्याचे ताब्यातील ट्रक पुन्हा वेगाने चालवुन मला फरफटत नेउन आमचे अपघातास, मोटारसायकलचे नुकसानीस व माझा मित्र कैलास उल्हास अमोलीक याचे मृत्युस कारणीभूत होउन माझे कमी अधिक दुखापतीस कारणीभुत झाला आहे. व आम्हाला अपचात ठिकाणी मदत न करता निघुन गेला आहे म्हणुन माझी ट्रक के एम. एच. 16 ए.ई 9207 ही वरील चालक नाव अप्पासाहेब लक्ष्मण साबळे रा. देवटाकाळी ता. शेवगाव याचे विरुदध फिर्याद आहे.
या फिरतीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०३अ,२७९,३३७,३३८
मोटरवाहन अधिनियम १९८८ कलम
१३४अ,१३४ब,१७७,१८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!