Wednesday, February 21, 2024

या कार्डमुळे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ; योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे.

ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे.आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आखलेली योजना आहे. या योजनेद्वारे

कोट्यवधी अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ योजनेची (आयुष्मान भारत योजना ) घोषणा केली आहे.

ही योजना पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर 2019 पासून देशभर लागू करण्यात आली. सरकार एबीवायच्या माध्यमातून गरीब, उपेक्षित कुटूंब व शहरी गरीब कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे की, महिला, लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना एबीवाय योजनेत प्राधान्याने सामील करून घेतले जाईल. आयुष्मान भारत योजनेचा (एबीवाय) लाभ घेण्यासाठी कुटूंबाचा आकार व वयाचे कोणतेही बंधन नाही.

SECC च्या आकडेवारीनुसार आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) लोकांना आरोग्य विमा मिळत आहे. एसईसीसीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील D1, D2, D3, D4, D5 आणि D7 कॅटेगरीतील लोक

आयुष्मान भारत योजनेत सामील करण्यात आले आहेत.शहरी भागात कामानुसार लोक आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत आधीपासूनच समाविष्ट

लोक आपोआप आयुष्मान भारत योजनेचे लाभारती झाले आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे व हे कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी

आगोदर आपणास आयुष्मान कार्ड-ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!