माय महाराष्ट्र न्यूज :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा म्हणून बुधवार (दि.१४) फेब्रुवारी रोजी
महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या दिवशी जिल्ह्यात बंद पुकारण्यात येणार आहे. या बाबत
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.सर्व सामान्य मराठा समाज आरक्षणासाठी शांततेत मोर्चे काढून सरकारला आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारला वेळ देऊन सुद्धा
सरकार वेळकाढूपणा करत आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर, महाराष्ट्रात उद्रेक होईल, याची सरकारने गांभीर्याने दाखल घ्यावी. नगर जिल्ह्यातील सर्व समाज त्यांच्या पाठीशी असून,
त्यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून नगर शहरासह संपूर्ण
जिल्हा बंद पुकारण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे व तसा कायदापारीत होण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. त्यांना पाठिंबा म्हणून नगर
जिल्ह्यासह शहरात बंद पाळण्यात येणार आहे. तसेच शहरात सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या बंद मध्ये सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.