Monday, May 27, 2024

अत्यंत महत्त्वाची बातमी:नगर-दौंड मार्गावरील वाहतूकीस बदल

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नगर-दौंड मार्गावर असलेल्या नगर- बीड रेल्वे मार्गाच्या क्रॉसिंग पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दि.२१ फेब्रुवारी रोजी

रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक कायनेटिक चौक ते केडगाव बायपास मार्गे वळविण्यात येत असल्याचे, आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.

या आदेशात म्हंटले आहे की, दि. १४ ते दि. २१ फेब्रुवारी रोजी दरम्यान नगर ते दौंड जाणारे रस्त्यावर नगर- बीड रेल्वे लाईनला ओलांडणी पुलाचे बांधकाम सुरु होत आहे. या बांधकामासाठी साईटच्या

जवळ मोठमोठे गर्डर वर्णावण्यात आले आहेत. सदर गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत. हा रहदारीचा रस्ता असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या

मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे दि. १४ रोजीचे सकाळी ८ ते दि. २१ रोजीचे रात्री ८ वाजे पर्यंत नगर दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास या रोडवरील येणारी व जाणारी सर्व प्रकारची वाहतुक बंद राहणार आहे.

त्यामुळे कायनेटीक चौकातुन दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग – कायनेटीक चौक – केडगाव- केडगाव बायपास अरणगाव बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील.

अरणगाव चौकातुन कायनेटीक चौकाकडे येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग – अरणगाव बायपास केडगाव बायपास केडगाव कायनेटीक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. पुणेकडुन दौंड रोडला जाण्यासाठी कायनेटीक

चौकात येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग-केडगाव बायपास अरणगाव बायपास दौंड रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. असे या आदेशात म्हंटले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!