माय महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. शरद पवार गटाकडून मात्र याबाबतचा दुजोरा देण्यात आलेला नाही.
शरद पवार गटाची पुण्यात बैठक लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाती बैठक बोलवली आहे. शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत.
या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे,रोहित पवार,अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला. त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेले आहे.
यानंतर आज पुण्यात शरद पवार यांची पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे.याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाचे मंगलदास बांदल
यांनी दुजोरा दिला आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’होय, याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरु आहे.