Thursday, May 2, 2024

खासदार सदाशिव लोखंडेंच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंच्या उमेदवारीला शिवसेनाचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडून विरोध होत आहे.

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे नगर जिल्हाध्यक्ष अंकुश काळे यांनी त्यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.श्री.काळे यांनी पत्रा म्हटले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम

वाजु लागले आहेत.शिर्डी लोकसभा मतदार संघात भाजपाची व शिवसेना (शिंदे गट) यांची ताकद जास्त आहे. विद्यामन खासदार सदाशिवराव लोखंडे हे कुणाच्याही संपर्कात नाही. शिर्डी लोकसभा मतदार संघात ८०० गावे आहेत. मतदार संघ शेती प्रधान आहे.

अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला. हे खासदार शेतकऱ्याकडे फिरकले सुद्धा नाही. कोविड काळात हे भुमिगत राहिले. मतदार संघात दहा वर्षामध्ये किती निधी आणला ? किती प्रकल्प आणले ? या कारणांनी प्रत्येक गावात नाराजी आहे. खासदारांचे प्रत्येक तालुक्यातील राजकीय विरोधकांशी साठे-लोटे आहे.

अद्यापही ते भाजप व शिवसेनेतील नेते, कार्यकर्ते यांच्याही संर्पकात नाहीत. ते फक्त कॉन्ट्रॅक्टर यांनाच घेऊन फिरतात.ते कुणाचाही फोन उचलत नाही. त्यांचे पीए सुद्धा कुणाचा फोन उचलत नाही. चहा पेक्षा किटली गरम या म्हणी प्रमाणे चालू आहे.

पंतप्रधान मोदी साहेबांमुळे कार्यकर्ते शांत राहिले, पण आता शांत बसणार नाही. त्यांचा संपर्क नसतानाही त्याना दोन वेळेस जनतेने खासदार केले. त्यामुळे या वेळेस खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी

देऊ नये अशी आम जनतेची मागणी आहे असे पत्र काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!