माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पहाटची थंडी कमी झाली आहे. तसेच दुपारी उन्हाचा चटकाही काहीसा वाढला आहे. तर विदर्भात मात्र काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तर उर्वरित
राज्यात उन्हाच्या झळाही अनुभवायला मिळतायत.आज विदर्भातील चार जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातील चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ
जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडं राहिलं, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.उत्तरेत पश्चिम हिमालय भागात १७ ते २० फेब्रुवारीच्या
दरम्यान हिमवर्षा आणि पावसाची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात कमाल तापमान वाढ होण्याची शक्यता आहे.तसेच मागील २४ तासात
देशातील सर्वात कमी तापमानाची नोंद अमृतसर येथे झाली. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्यप्रदेश. छत्तीसगडमध्ये विजांसह पावसाची शक्यता तर तामिळनाडू, पॉडीचेरी, कारईकल आणि केरलाच्या काही ठिकाणी विजासह
हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.दरम्यान आज विदर्भातील चार जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामान
अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात अनेक भागात रब्बी हरभरा काढणी सुरू आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.