Monday, May 27, 2024

माजी सरपंच प्रियंका आरगडे राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतच्या माजी लोकनियुक्त सरपंच सौ.प्रियंका शरदराव आरगडे यांना दक्ष मराठी पत्रकार संघ पुणे व श्री भगवान श्रीमंदीलकर यांच्या राजर्षी शाहू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आला.

सौ.प्रियंका आरगडे यांच्या कार्यकाळात सौंदाळा गावात मोठ्या प्रमाणात ग्रामविकासाची कामे झाली आहेत
१८ वर्ष पूर्ण असलेल्या मुलीच्या विवाहात संसार उपयोगी वस्तू खरेदीसाठी ५ हजार
रुपये अनुदान, दरवर्षी दीपावली निमित्त माणसी दिड किलो मोफत साखर वाटप,
५ रुपये मध्ये २० लिटर थंड व शुद्ध आरोप्लांटचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.५ रुपये पायली प्रमाणे गिरणीत धान्य दळून दिले जाते,महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम ५०% दरात सलून चालवले जाते,अपंग व्यक्तीना साहित्य व रोख रक्कम दिली जाते.नेवासा तालुक्यात लोकसंख्ये प्रमाणे सर्वात जास्त प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल २७६ मंजूर केले.रमाई आवास योजनेचे ६० घरकुल बांधून पूर्ण केले.गावात सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले.सार्वजनिक ठिकाणी वॉशबेसिन बसविले. आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीस १००० रु भाऊबीज दिली जाते.भरतीपूर्व तयारी करण्यासाठी तरुणांना अभ्यासिका उपलब्ध करून दिली.महिला आर्थिक सबळीकरनासाठी लोकसेवक पतसंस्था स्थापन केली.गावातील गोरगरीब ग्रामस्तांना मदत म्हणून माणुसकीची भिंत ही संकल्पना राबवली आदी कामे केल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार मिळाल्याने आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!