माय महाराष्ट्र न्यूज:मुकुल राॅय यांनी ३ नाेव्हेंबर २०१७ राेजी भाजपमध्ये प्रवेश केला हाेता. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले हाेते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला माेठी गळती लागली हाेती. मात्र, आता वारे विरुद्ध दिशेने वाहू लागले आहेत. भाजपमध्ये गेलेले अनेक जण घरवापसीसाठी इच्छुक आहेत.
तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले मुकुल राॅय यांची अखेर घरवापसी झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल राॅय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.
मुकुल राॅय यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर ममता म्हणाल्या, राॅय यांना भाजपमध्ये धमक्या मिळत हाेत्या. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली हाेती. ते आता पक्षात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. निवडणुकीच्या ताेंडावर भाजपमध्ये गेलेले गद्दार असून, त्यांना पक्षात परत घेणार नसल्याचे ममतांनी स्पष्ट केले.