Saturday, December 21, 2024

हाती काहीही लागणार नाही; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचे मोठं विधान

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे उद्या होणाऱ्या अधिवेशनातून मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र या अधिवेशनातून काहीही हाती

लागणार नाही, अशी रोखठोक भूमिका आज राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून मांडली आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले की, “

यामध्ये काहीही होणार नाही. हा विषय राज्याचा नाहीच. हा विषय केंद्र सरकारचा आणि सुप्रीम कोर्टाचा आहे. आरक्षण देण्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर झाल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही.

या सगळ्यातून फक्त झुलवलं जातं. यातून काहीही हाती लागणार नाही. मी त्या दिवशी हे होणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यासमोरच जाऊन सांगितलं होतं .अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे. दरम्यान, विशेष अधिवेशनातून

काहीही हाती लागणार नाही, या राज ठाकरेंच्या भूमिकेवर राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.कायद्याच्या चौकटीत

बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न

करीत आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पाऊले उचलली आहेत. आयोगाने विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला आहे. २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील

आम्ही बोलाविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!