Saturday, December 21, 2024

हृदयरोग असलेल्यांनी ही बातमी वाचाच अन्यथा…

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हृदयाचा आजार कुणालाही होऊ शकतो. त्यातील एक कोरोनरी आर्टरी डिसीज . जो हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होतात किंवा प्लाक

तयार झाल्यामुळे ब्लॉक होतात तेव्हा होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर देखील होऊ शकते.या अडचणींमुळे हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी अनेकदा तणावाची (Stress) पातळी वाढते,

ज्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिघडू शकते. या व्यक्तींनी कोणत्याही प्रवासाला जाण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे. प्रवास करते वेळी वैद्यकीय मदत मिळेल याची खात्री करणे गरजेचे आहे.

प्रवास करण्यापुर्वी आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.हृदयविकार असलेल्या लोकांसाठी, सुरक्षित आणि आनंददायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी काही सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. प्रवास

सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते औषधोपचार तसेच प्रवास करताना तणावाचे व्यवस्थापन करण्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात.प्रवासादरम्यान

अनपेक्षित विलंब किंवा आणीबाणीच्या बाबतीत आवश्यक औषधे सोबत बाळगणे गरजेचे आहे.हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी विचारपूर्वक त्यांच्या प्रवासाची योजना आखणे महत्त्वाचे ठरते. प्रवासापूर्वी

जवळपासच्या वैद्यकीय सुविधांबाबत माहिती गोळा करणे गरजेचे आहे.हृदयविकारासह प्रवास करताना निरोगी जीवनशैली बरोबरच पोषक आहाराची आवश्यकता आहे. प्रवास करताना तुमचा रक्तदाब

नियंत्रणात ठेवण्यासाठी सुकामेवा आणि तेलबिया, ताजी फळे आणि भाज्या यासारख्या कमी सोडियमयुक्त पदार्थांची निवड करा. प्रवासात हेल्दी स्नॅक्स सोबत ठेवा.जेणेकरुन जंक फूड, तेलकट पदार्थांपासून दूर राहता येते.

प्रवास करताना हृदयविकार असलेल्या लोकांसाठी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि साखरयुक्त पेये किंवा कॅफीनयुक्त पेय टाळा, कारण ते निर्जलीकरणास कारणीभूत ठरू शकतात आणि हृदयाच्या समस्या वाढवू शकतात.

प्रवासादरम्यान बाहेर जेवताना सॅलडसारखे पर्याय निवडणे योग्य राहिल. जेवणाच्या वेळेचे योग्य नियोजन करून आणि योग्य निवड करा. अशारितीने तुम्हा तुमच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

दीर्घकाळापर्यंत बसून हलकी शारीरिक हालचाली केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राखण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. हे उपाय गांभीर्याने घेतल्यास हृदयविकार असलेल्या व्यक्ती आत्मविश्वासाने प्रवास करू शकतात.

बायपास शस्त्रक्रियेनंतर प्रवास करताना सिक्युरिटी परिक्षणादरम्यान आतील स्टर्न वायरमुळे स्कॅनदरम्यान आवाज येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांचे पत्र किंवा तुमच्या डिस्चार्जच्या सारांशाची प्रत घेऊन जायला विसरु नका.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!