माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू असलेली दिसत आहे. आठवडाभरात सोने दर एक तोळ्यामागे (१० ग्रॅम) ९०० रुपयांनी घसरले. सोन्याचा
दर प्रतितोळा ६२ हजारांपर्यंत आहे. चांदी दरात मात्र कुठलीही घट झालेली नसल्याची स्थिती आहे.खरेतर सोने-चांदीच्या दरात आखातातील अस्थिरता व अमेरिका, युरोपातील वित्तीय
घडामोडींमुळे सतत चढउतार झाले. सोनेदर नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत वधारले. परंतु फेब्रुवारी महिन्यात नरमाई कायम दिसत आहे. मागील ४५ ते ४६ दिवस सोनेदर सतत कमी झाले आहेत.
जळगावच्या सुवर्ण बाजारात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर प्रतितोळा ६३ हजार ४०० रुपये असे होते. तर चांदीचे दर प्रतिकिलो ७३ हजार रुपयांवर होते.परंतु गेल्या १५ दिवसांत सोनेदर एक
तोळ्यामागे १२०० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच आठवडाभरात सोने दर एक तोळ्यामागे ९०० रुपयांनी घसरले आहेत, अशी माहिती बाजारातील विश्लेषकांनी दिली.मागील पंधरवड्याच्या
अखेरीस सोन्याचा दर ६३ हजार १०० रुपये प्रतिकोळा होता. त्यात मागील आठवड्यात घसरण झाली. दर सध्या विना जीएसटी ६२ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर स्थिर आहे.
चांदीदरातही मागील काही दिवसांत एक किलोमागे एक हजार रुपयांची घट झाली. चांदीचा दर प्रतिकिलो विना जीएसटी ७२ हजार रुपयांवर स्थिर आहे, असे सांगण्यात आले.