माय महाराष्ट्र न्यूज:आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाच्या सुरुवातीची तारीख उघड झाली आहे. यावेळी 10 संघांसह जगातील सर्वात मोठी लीग 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचे
अध्यक्ष अरुण धुमळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. हे लक्षात घेऊन ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल 2024 चा हंगाम फक्त भारतातच खेळला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 2009 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे परदेशात आयोजन करण्यात आले होते.
परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने भारतात आयपीएलच्या 12 व्या हंगामाचे यशस्वी आयोजन केले होते. हे लक्षात घेऊन यावेळीही आयपीएल गव्हर्निंग
कौन्सिलने 17वा हंगाम भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आयपीएलला या लीगचे वेळापत्रक सरकारच्या सहकार्याने बनवावे लागणार आहे.वृत्तसंस्था पीटीआयने अरुण धुमळच्या हवाल्याने सांगितले की, 22 मार्चला
ही स्पर्धा सुरू होऊ शकते. आम्ही सरकारी एजन्सींसोबत मिळूल काम करत आहोत आणि इंडियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक तयार केले जात आहे. संपूर्ण टूर्नामेंट भारतात होणार आहे.
2008 मध्ये सुरू झालेल्या या लीगचे वेळापत्रक अनेकदा दर 5 वर्षांनी होणाऱ्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांसोबत अडकते. 2009 मध्ये पहिल्यांदाच ही लीग दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती.