माय महाराष्ट्र न्यूज:मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला येत्या 24 फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी त्यांनी सकाळी 10.30 वाजेपासून
दुपारी एक वाजेपर्यंतचा वेळ दिला होता. पण बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरु असल्याने अनेकांनी मनोज जरांगे यांना पत्राद्वारे मनोज जरांगे यांना रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.
त्यामुळे मनोज जरांगे यांनी रास्ता रोको आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा आंदोलकांनी अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “आपण थोडासा यात बदल केला तर चांगलं राहील. मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं,
एखाद्या लेकीबाळीचा पेपर राहायला नको. याची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. 24 तारखेचा रस्ता रोको आहे त्यामध्ये 11 ते 1 असा बदल करावा. या बदलमुळे कुणाला पेपरला जायचं असेल
तर अडचण येणार नाही. हा बदल आपण आवश्य करावा”, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.अर्ध्या तासाने काही फरक पडत नाही. मराठा समाजाने हा बदल करणं अपेक्षित आहे. आपल्याला
न्याय घ्यायचा असेल तर इतर समाजावर अन्याय होता कामा नये. माझ्याकडे पाच ते सात समाजाचे पत्र येऊन पडले आहेत. या समाजाने आपल्याला साथ दिली आहे. राज्यसभरात येत्या 24 तारखेला
11 ते 1 यावेळेत रास्ता रोको आंदोलन करु. त्यानंतर 25 तारखेपासून रास्ता रोको आंदोलनाचं रुपांतर काही दिवसांसाठी धरणे आंदोलनात करु. त्यामुळे परीक्षा आणि इतर कामांना अडचणी येणार नाहीत. हे माझं वैयक्तिक मत आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आपल्या दारात एकाही राजकीय पक्षाने यायचं नाही हे कायमचं ठरलं आहे. तसेच 3 मार्चला रास्ता रोको ठेवलेला आहे तो फायनल आहे. राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात एकावेळी
एकाच ठिकाणी हा रास्ता रोको आंदोलन होईल”, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. “रास्ता रोको आंदोलनाची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये, लेकीबाळींमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपल्याकडून नाही
तर इतर कुणी काही करण्याची भीती आहे. आपल्याकडून नाही तर कुणी दुसरीकडून करण्याची भीती आहे. आपली जबाबदारी फक्त रास्ता रोकोची आहे. रास्ता रोकोच्या 50 मीटरवर जरी काही झालं तरी ती
करणाऱ्याची आणि सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे 24 तारखेचा रास्ता रोको 11 ते 1 यावेळेत करावा. त्यानंतर धरणे आंदोलन करा. हे धरणे आंदोलन कायम सुरु ठेवावं”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.