माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडेकांदा पिकावर होणारा खर्च वाढत असताना दुसरीकडे अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत असलेल्या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक
मेटाकुटीला आला आहे. बाजारभावच मिळत नसल्याने शेतकरी हतबल असून कधी निर्यात खुली होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. अशातच आजच्या बाजारभावाचा विचार केला
तर लासलगाव बाजारसमितीमध्ये चारशे नगांची आवक झाली. जवळपास 1700 रुपयांचा बाजारभाव मिळाला. आज 24 फेब्रुवारी 2024 रोजी लासलगाव बाजारसमितीमध्ये लाल कांद्याची 06 हजार क्विंटल इतकी आवक झाली
तर कमीत कमी 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर येवला बाजार समिती 14 हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर
700 रुपये मिळाला तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. लासलगाव – विंचूर बाजार समितीत 13 हजार 200 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 900 रुपये दर मिळाला.
तर सरासरी 900 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज पोळ कांद्याची 11 हजार 900 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1750 दर मिळाला.
राज्यातील कांदा बाजारभाव कोल्हापूर बाजार समितीत 5125 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1500 रुपये दर मिळाला. पुणे-मोशी बाजार समितीत 764 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये दर मिळाला.
आणि सरासरी दर देखील 850 रुपये दर मिळाला. नागपूर मार्केटमध्ये आज पांढऱ्या कांद्याची 600 क्विंटल आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 2125 दर मिळाला.
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये 1444 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 250 रुपये तर सरासरी केवळ 1100 रुपये दर मिळाला.