भेंडा:पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघ, विवेकानंद कला महाविद्यालय, शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने
आयोजित पहिल्या परिवर्तनवादी युवा साहित्य संमेलनामध्ये श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भेंडा येथील डॉ. राजेंद्र गवळी यांच्या ‘मराठी आत्मकथनांतील
पारधी समाजजीवन’ या समिक्षा ग्रंथास राज्यस्तरीय रावसाहेब दहिवाळ साहित्य पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सर्जेराव जिगे यांचे
अध्यक्षतेखाली तसेच प्रा.डॉ.संजय चव्हाण, प्रा.डॉ.दैवत सावंत, डॉ.मोहन सौंदर्य, प्राचार्य युवराज धबडगे, डॉ.शिवाजी हुसे, डॉ.हंसराज जाधव, डॉ.प्रकाश इंगळे, पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाचे अध्यक्ष मा. समाधान दहिवाळ,
डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थित छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आले. डॉ.राजेंद्र गवळी यांचे आतापर्यंत स्नेहमयी, उजेडाचे दूत, शंख, शिंपले आणि मोती, मृदगंध ही पुस्तके प्रकाशित झाली
असून त्यांना सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य संशोधन पुरस्कार, राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार, स्व. भाऊसाहेब देशमुख वाचनालय साहित्य पुरस्कार, अ.भा.मराठी शेतकरी साहित्य
चळवळ विश्वस्तरीय छंदोबद्ध कविता लेखन स्पर्धा द्वितीय पुरस्कार, महाराष्ट्र टिचर्स असोशिएशनचा आदर्श शिक्षक (शिक्षण व साहित्य)पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या यशाद्दल श्री. मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्रजी घुले पाटील,
मा.आ.चंद्रशेखरजी घुले पाटील, मा.आ.पांडूरंग अभंग, मा.अॅड देसाई देशमुख, सचिव मा.अनिल शेवाळे, सहसचिव मा.रविंद्र मोटे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, प्राचार्य प्रा.डॉ.शिरीष लांडगे, प्राचार्या डॉ.जयश्री सरवदे, प्रा.सुधाकर नवथर,आदींनी अभिनंदन केले.