नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला भारतीय शुगर या संस्थेकडून राज्य पातळीवरील बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अँवार्ड हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचा ज्ञानेश्वर उद्योग समूह व कामगार संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला.
गुरुवार दि.२९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कारखाना संचालक मंडळाच्या सभेत घुले बंधूंचा कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व ज्येष्ठ संचालक ऍड.देसाई देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे,विठ्ठलराव लंघे, काकासाहेब शिंदे, काशीनाथ नवले, दादासाहेब गंडाळ,शिवाजी कोलते,भाऊसाहेब कांगुणे, मछिंद्र म्हस्के, जनार्दन कदम, पंडितराव भोसले,दीपक नन्नवरे,शंकरराव पावसे,विष्णू जगदाळे,बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे ,कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव मिसाळ,कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे,तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी,महेंद्र पवार,अप्पासाहेब खरड, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर,प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके,एन.बी.पुंड, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के आदी यावेळी उपस्थित होते.
हा पुरस्कार म्हणजे…संचालक मंडळाचे नियोजन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य, अधिकारी-कामगारांचे परिश्रम या सर्वांचा परिपाक म्हणजे हा पुरस्कार.
–ऍड.देसाई देशमुख
जेष्ठ संचालक