भेंडा:नेवासा तालुक्यातील तरवडी येथे बाळकृष्ण महाराज सावखेडा, बन्सी महाराज तांबे, महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज
ज्ञानेश्वरी पारायण व शिवलीलामृत पारायण सोहळ्याला शनिवारी 2 मार्च रोजी हरी भक्त परायण माजी आमदार पांडुरंग अंभग , देसाई आबा देशमुख, एकनाथ कावरे,रामनाथ महाराज राजगुरू, अशोक मंडलिक ,
आत्माराम लोंढे, जनार्धन भालेराव यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरी पारायणाचे पूजन सकाळी करण्यात आले.या सप्ताहाचे हे 24 वर्षं असल्यामुळे मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.बुधवारी देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज
यांची सदिच्छा भेट आहे. या सप्ताह काळात राम महाराज खंरवडीकर, सुधाकर महाराज वाघ, दादा महाराज वायसळ, स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज, महंत कैलासगिरी महाराज, अर्चनाताई गिरी, रामकृष्ण महाराज शास्त्री यांचे किर्तन होणार आहे.
या सप्ताहाची सांगता शनिवारी 9 तारखेला रामनाथ महाराज राजगुरू यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.सप्ताह प्रारंभी गावातील सर्व भजनी मंडळी माता भगिनी, तरुण मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.