Monday, May 27, 2024

उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढणार, हवामान विभागाचा इशारा

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदाच्या थंडीमध्ये फारशा थंडीचा अनुभव न आल्याने उन्हाळा अधिक तापदायक ठरणार का, अशी शंका निर्माण झाली होती. ती खरी ठरणार असल्याची चिन्हे उन्हाळ्याच्या

काळासाठीच्या पूर्वानुमानानुसार दिसत आहेत. शुक्रवारी १ मार्च रोजी भारतीय हवामान विभागातर्फे उन्हाळ्यासाठीचे पूर्वानुमान जाहीर केले. यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे या तीनही महिन्यांमध्ये

देशाच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेच्या लाटांची वारंवारता सरासरीपेक्षा जास्त असू शकेल, असा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मार्चमध्ये महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

देशाच्या बहुतांश भागामध्ये पुढील तीनही महिन्यांमध्ये कमाल तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असेल. वायव्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारत येथील तुरळक भाग वगळता कमाल तापमानाचा पारा चढा

असेल. किमान तापमानही या तीनही महिन्यांमध्ये सरासरी किमान तापमानाहून अधिक असेल. या तीनही महिन्यांमध्ये ईशान्य भारत, हिमालयाचा पश्चिमी भाग, पश्चिम किनारपट्टी, तसेच भारतीय द्विपकल्पाचा

नैऋत्य भाग वगळता उर्वरित भारतामध्ये उष्णतेच्या लाटांची वारंवारता सरासरीहून अधिक असेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मार्चमध्ये ईशान्य भारत, दक्षिण भारत येथे उष्णतेच्या लाटा

अधिक जाणवू शकतात. महाराष्ट्र, तसेच ओडिशाच्या काही भागातही याची तीव्रता वाढू शकते. मार्च महिन्यात ईशान्य, पश्चिम मध्य भारत, दक्षिण भारत येथे कमाल तापमान सरासरीहून अधिक असेल.

पूर्व आणि पूर्व मध्य भारतात, तसेच वायव्य भारताचा काही भाग येथे कमाल तापमान सरासरीइतके किंवा सरासरीहून थोडे कमी असू शकेल. हिमालयीन भाग वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये मार्चमध्ये

किमान तापमान सरासरीहून जास्त असेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रात उत्तर कोकणातही कमाल आणि किमान तापमान मार्च महिन्यामध्ये सरासरीहून जास्त असू शकेल, असे भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

मात्र उष्णतेच्या लाटांचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला तुलनेने कमी बसेल, अशी शक्यता असल्याने कोकण विभागातील नागरिकांना याचा त्रास तुलनेने कमी होईल, असाही अंदाज आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!