माय महाराष्ट्र न्यूज:पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत
पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यासह देशात काही भागात वीकेंडला पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं आहे. शनिवारी अनेक भागात पाऊस झाला असून आज रविवारीही
पावसाचा अंदाज कायम आहे. राज्यासह देशात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यासह देशात विविध ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यासोबतच काही
भागात गारपीट होण्याचाही अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, नवी मुंबई, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही काही
ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत काही भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस
तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, आज जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम
पाऊस किंवा हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय, हवामान खात्याने आज दिल्ली, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेशसह इतर प्रदेशांसह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.