Tuesday, October 15, 2024

शेतीला साश्वत पाणी मिळवायचे असेल तर पाणी वापर संस्थे शिवाय पर्याय नाही-जलमित्र सुखदेव फुलारी

नेवासा/प्रतिनिधी

पाणी वापर संस्थांच्या मार्फत पाणी कोट्याची शाश्वती आणि कोणते ही पीक घेण्याचे स्वातंत्र्य हा हक्क महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा २००५ या कायद्याने शेतकऱ्यांना दिलेला आहे.तसेच संस्थेशिवाय कोणाला ही वैयक्तिक पाणी मिळणार नाही अशी तरतूद केलेली आहे. त्यामुळे शेतीला साश्वत पाणी मिळवायचे असेल तर पाणी वापर संस्थेशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन पाणी वापर संस्थांचे अभ्यासक जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.

नेवासा तालुक्यातील वाकडी येथे *मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन चिलेखनवाडी उपविभाग अंतर्गत आयोजित जलजागृती सप्ताह कार्यक्रमात मार्गदर्शन करताना *जलमित्र सुखदेव फुलारी* बोलत होते.
पाटबंधारे विभागाचे *उपकार्यकारी अभियंता संदीप पवार* हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अंकुशराव काळे, जगदंबा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गायकवाड, उपाध्यक्ष कचरू काळे, सचिव रोहिदास काळे,
कालवा निरीक्षक संतोष राऊत, सलमान शेख, बापू काळे, पोपट दरंदले, सुधीर चव्हाण, सुमित कोरडे, विकास घोक्षे,रावण ससाणे,यूनुस शेख,नितीन लांडे,श्रीकांत करंजे, कर्मचारी सुभाष गायकवाड गावाजी शिरसाठ,समीर पठाण आदीसह शेतकरी,विद्यार्थी महिला यावेळी उपस्थित होते.

श्री.फुलारी पुढे म्हणाले की, मानवाच्या जीवनात पाण्याचे संवर्धन आणि महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी एक दिवस समर्पित केला पाहिजे या हेतुने १९९३ पासून २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो. शांततेसाठी पाणी (वॉटर फ़ॉर पीस) ही या वर्षिच्या जागतिक जलदिनाची थीम आहे. पाणी शांतता निर्माण करू शकते किंवा संघर्षाची ठिणगी निर्माण करू शकते. जेव्हा पाणी टंचाई असते तेंव्हा लोक पाण्यासाठी संघर्ष करतात, तणाव वाढू शकतो. पाण्यावरुन प्रादेशिक संघर्ष होतात. प्रत्येकाच्या पाण्याच्या गरजा संतुलित करून आपण जग स्थिर ठेवण्यास मदत करू शकतो. समृद्धी आणि शांतता पाण्यावरच अवलंबून आहे.
पाणी नसेल तर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. त्यामुळे जल,जंगल व जमीन या तीन गोष्टीला आपण जपले पाहिजे. उद्या पाणी येणार नाही म्हणून आज पाणी जपुन वापरा ही मानसिकता बदलून दररोज पाणी जपुन वापरा म्हणजे उद्या पाणी नक्की येईल ही धारणा ठेवा.
धरणे व त्यातील पाणी ही सार्वजनिक संपत्ती आहे.शेतीला दिले जाणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या हाती दिले तर समन्यायी व प्रभावी सिंचन होईल,पाण्याची उत्पादता वाढेल या हेतुने
महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा २००५ या कायद्या अंतर्गत पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे,त्याचा सर्वानी अभ्यास करून संस्था अधिक कार्यक्षम केल्या पाहिजेत.
*कालवा निरीक्षक राऊत यांनी प्रास्ताविक केले व उपस्थितांना जल प्रतिज्ञा दिली.*
कालवा निरीक्षक रावण ससाणे यांनी पाण्यावरील कविता सादर केली.

 *खडका सिंचन शाखेची जलजागृती*
—————————————–
नेवासा तालुक्यातील खडका सिंचन शाखेच्या लाभ क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा खडका येथे जल जागृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी वितरिकास्तरीय अध्यक्ष शशिकांत भोरे पाटील, माजी सरपंच, ग्रामस्थ तसेच शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी कालवा निरीक्षक श्री.शिरसाट
यांनी जल प्रतिज्ञा दिली व विद्यार्थ्यांना श्री.भोरे व श्री.देहाडराय यांनी पाण्याचा सुयोग्य वापर यावरती मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाखेचे कर्मचारी श्री.शेटे, श्री.धनक व श्री. पंडित तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

*भानसहिवरे येथे जलजागृती कार्यक्रम*

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे विरभद्र पाणी वापर संस्था व मुळा पाटबंधारे विभाग यांचे वतीने जलजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधवांना पाणी व्यवस्थापन व बचतीचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा पाटबंधारे विभागाच्या शाखाधिकारी श्रीमती चोरमुंगे या होत्या.
यावेळी पाटबंधारे विभागाच्या श्रीमती साठे, श्रीमती शिंदे, श्रीमती यादव, श्री खंडाळे,पोपट शिंदे, लक्ष्मणराव मोहिटे, अशोकराव टेकणे, अशोकराव टाके, दिलीप शिरसाट, रघुनाथ काळे, ज्ञानदेव मोहिटे ,शाहुल मकासरे, वनिता मोहिटे,मीना मोहिटे, रामदास दिवटे, विलास काळे, किशोर मोहिटे, सचिन मोहिटे , कावेरी मोहिटे, जयश्री मोहिटे,पोपट टाके, यांचेसह विरभद्र पाणी वापर संस्थेचे संचालक व शेतकरी हजर होते. प्रास्ताविक श्रीमती साठे यांनी केले.लक्ष्मणराव मोहिटे यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!