माय महाराष्ट्र न्यूज:विजय शिवतरे यांनी घेतलेली बंडाची भूमिका कायम असून त्यांनी आज अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
शिवतारे यांनी पुन्हा एकदा घणाघाती प्रहार करत गंभीर आरोप केले. शरद पवारांचा माणूस असल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विजय शिवतारे म्हणाले की, मी लढतोय ते जिंकण्यासाठीच
आहे. माझी लढाई पवारांविरोधात असल्याचे विजय शिवतरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विजय शिवतरे यांनी आज अजित पवार यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली. शिवतारे म्हणाले की राष्ट्रवादीकडून
काही गैरसमज पसरवले जात आहेत की मी मला फक्त अजित पवार यांना हरवायचा आहे आणि मी शरद पवार यांचा माणूस आहे. मात्र, असा नालायकपणा मी कधीच करणार नाही.
मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. त्यांनी सांगितले की ही लढाई खूप मोठी आहे. सुनील तटकरे म्हणत आहेत की शिवतारांचे स्क्रिप्ट
कोण लिहून देतो ते आम्ही शोधत आहोत. ते म्हणाले की, मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प राहिला. शरद पवार यांना देखील माहित आहे शिवाजी विजय
शिवतारे कोण आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम असल्याचे ते म्हणाले. दरम्यान शिवतारे यांनी ग्रामीण दहशतवादी शब्दही वापरला. ते म्हणाले की ग्रामीण दहशतवाद शरद पवारांनी केला.
माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहिती पडेल. 70 वर्षात त्यांनी काय केलं फक्त घुसले आणि घुसखोरी केली असा आरोप
विजय शिवतारे यांनी केला. ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली आणि पवारांची कंपनी आली. अजित पवार आणि शरद पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस हसून दोघांचा खात्मा करायचा असल्याचे विजय शिवतारे म्हणाले.