नेवासा
धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समजाकडून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल येथे रास्ता रोको करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने धनगर समाज या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालाय. सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे.