Sunday, October 6, 2024

नेवासा-मतदान ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या वाहनाला अपघात

नेवासा

नेवासा तालुक्यातील नेवासा-शेवगाव रोडवरील नागापूर शिवारात मतदान ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या वाहनाला अपघात झाला असून यातील पोलीसासह चालक जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निवडणूक आयोगाच्या नेवासा तहसील कार्यालय मार्फत सुरू असलेल्या मतदान ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या एम.एच.४ डी.सी. ८१६३ गाडीचा चालु गाडीमध्ये अचानक एक्सीलीटर फसल्याने गाडीची गती वाढली व गती वाढल्याने वाहन चालकाचा ताबा गाडीवरून सुटण्याच्या अगोदरच चालकाने ब्रेक दाबला असता गाडीला गती असल्यामुळे गाडीचा तोल जाऊन रस्त्याच्या मधोमध पलटी होऊन गाडी दोनशे फुटापर्यंत फरपटत जाऊन अपघात झाला.
या गाडीमध्ये बसलेले पोलीस कॉ.राहुल खंडागळे तसेच गाडीचा चालक किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघात व जखमींची माहिती घेतली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!