शिर्डी/प्रतिनिधी
संत नागेबाबा पतसंस्थेला मिळालेल्या.महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा. राज्यस्तरीय ‘ दिपस्तंभ पुरस्कार २०२४ ‘ चे वितरण सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी शिर्डीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते, फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कर्नाटक पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष संजय होसमठ,साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांचे प्रमुख उपस्थितीत पतसंस्थेच्या संचालक मंडळाला करण्यात आले.
नाशिक विभागातून पतसंस्थेला हा पुरस्कार मिळाला. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सहकार प्रशिक्षण व संशोधन मंदिर शिर्डी येथे नागेबाबा पतसंस्थेचे संचालक आबासाहेब काळे,अजित रसाळ,बाबासाहेब गायकवाड,सुनील गव्हाणे,राजेंद्र चिंधे,संजय नवले,सुभाष चौधरी, संजय मनवेलीकर,बाळकृष्ण पुरोहित यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
संस्थेला २५ वर्षामध्ये ३० पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये ३६५ दिवस सेवा देणारी विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळलेली एकमेव संस्था आहे. संस्थेचे १० लाख सभासद आहेत. संस्थेंने सभासद, कर्जदार यांचा विमा संरक्षण दिले आहे. नागेबाबा सुरक्षा कवच योजनेतून ६२ सभासदांच्या वारसदारांना ३ कोटी ४८ लाख रुपयांची आर्थिक मदत, तसेच १२७ सभासदांना १ कोटी १२ लाख रुपयांची दवाखाना खर्चाची मदत संस्थेने केली आहे. अहमदनगर येथे दवाखान्यात असणारे रूग्ण व सोबतचे नातेवाईक यांना मोफत जेवण दिले जाते. सध्या दररोज ४०० पेक्षा जास्त प्रेमाचे डब्बे दिले जातात. आजपर्यंत २ लाख ७४ हजार १९३ डब्बे देण्याचे काम संस्थेने केले आहे.हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथे संस्था गोशाळा चालवते. ३०० एकर जागेवर वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम संस्थेने हाती घेतला आहे. संस्थेच्या या कामामुळे संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई मार्फत दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार.नागेबाबा पतसंस्थेचे सामाजिक काम,तत्पर सेवा, शिस्तप्रिय काम,आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार याची दखल घेऊन दिला असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व मुख्याधिकारी सुरेखा लवांडे यांनी दिली आहे.
*या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली…
आम्हाला मिळालेल्या दिपस्तंभ पुरस्काराचे सर्व श्रेय सर्व खातेदार, कर्जदार,ठेवीदार,शुभचिंतक, सभासद,कर्मचारी बंधू भगिनी या सर्वांचे आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. इतर पतसंस्थांना दिपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करण्याचे काम करणार
आहे.
-कडूभाऊ काळे
संस्थापक/अधू